मार्गदर्शक
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.
मावळ प्रांत
सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.
बारा मावळ
- पवन मावळ.
- आंदर मावळ.
- कानद मावळ.
- मुठाखोरे.
- गुंजण मावळ.
- हिरडस मावळ.
- पौड मावळ.
- रोहिड खोरे.
शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी
- बाजी पासलकर.
- कान्होजी जेधे.
- तानाजी मालुसरे.
- बाजी प्रभू देशपांडे.
- मुरारबाजी.
- नेताजी पालकर.
- हंबीरराव मोहिते.
शिवाजी महाराजांचे सरसेनापती
- नेताजी पालकर.
- प्रतापराव गुजर.
- हंबीरराव मोहिते.

No comments:
Post a Comment